भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील कनिष्ठ( स्वतंत्र ) महाविद्यालयाचा 12 वी चा निकाल जाहीर झाला आसून यंदा मुलांपेक्षा मुलीनी बाजी मारल्याचे निकाला वरुन दिसून येत आहे. यामध्ये सायन्यचा 96 टक्के लागत तर वाणीज्य विभागाचा 99 टक्के तर कला शाखेचा 91 टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य विभागात सोमेश्वर चंद्रकांत पवार कॉलेजमधून 86.17 टक्के गुण घेवुन पहिला क्रमांक तर निकिता विनोद डिसले हिने 76.50 टक्के गुण मिळवत दुसरा तर दिक्षा दत्तात्रय बागडे हिने 76 टक्के गुण घेवुन तिसरा क्रमांक मिळवला. तर सायन्स विभागात प्रथम श्रेया आनंद सुर्यवंशी 76 टक्के तर दुसरा क्रमांक आकांश माणिक थोरात 74 टक्के व अनुष्का कमलाकर डोके हिने 73.17 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला. तर कला शाखेतुन प्रथम सानिया शब्बीर शेख 87.83 टक्के तर प्रथमेश बबण गायकवाड याने 84.33 टक्के घेवुन दुसरा तर नोबल नवनाथ जाधव हिने 82 टक्के गुण घेवुन कॉलेजमधून तिसरा क्रमांक मिळवला आहे. कला, वाणिज्य, सायन्स या शाखेसाठी शंकरराव पाटील महाविद्यालयातून 384 विद्यार्थी यांनी परिक्षा दिली होती. या पैकी 23 विद्यार्थी नापास झाले. तर 361 विद्यार्थी पास झाले आहे. यशस्वी विद्यार्थी यांचे संस्था अध्यक्ष डॉ उद्धवराव बोराडे, सचिव मुरलीधर भाउराव काटे , प्राचार्य संतोष शिंन्दे व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी अभिनंदन केले आहे.