धाराशिव (प्रतिनिधी)- किनी गावचे सुपुत्र किनी गावचे पंचक्रोशीत नावलौकिक करणारे रामकिशन दगडू कुंभार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल किनी गावातील मान्यवरांच्या हस्ते किनी गावामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी रामकिशन दगडू कुंभार यांनी किनी गावचे ग्रामदैवत काशी विश्वनाथ महाराज यांचे दर्शन घेतले.
यावेळी गावकऱ्यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला गावचे सरपंच बालाजी पाटील माजी उपसरपंच मोतीलाल पाटील व माजी सैनिक राजेंद्र भुतेकर व युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर पाटील व त्यांचा वर्गमित्र यांच्या हस्ते हार फेटा पुष्पगुच्छ देऊन नागरिक भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील कुंभार समाजाचे नेते तुकाराम कुंभार उद्योजक श्री ज्ञानेश्वर कुंभार व इतर तरुण वर्ग गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले गावचे होतकरू आदर्श व्यक्तिमत्व रामकिशन दगडू कुंभार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केल्याबद्दल रवी किशन दगडू कुंभार यांनी गावकऱ्यांचे आभार मानले व आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांचे वर्गमित्र सचिन घोडके, वाजिद शेख, तुकाराम पवार, अमर नाईक, इम्रान भाई शेख, सुरेश राऊत, सुनील राऊत, तेजस शितोळे, महेश हजगुडे, धनाजी भुतेकर, तानाजी भुतेकर, सदाशिव जाधव, गुणवंत हजगुडे, धर्मराज हजबुडे व समस्त गावकरी सहकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.