भूम (प्रतिनिधी)- वांगी खु येथील शेतकरी वस्तिवरिल धनवान भीमराव गुंजाळ यांच्या राहत्या घरासाठी लागणारे चालु विज कनेक्शन तोडले असल्याने धनवान भिमराव गुंजाळ यांनी जोडणी करण्यासाठी भूम येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले होते. सदरील उपोषणा संदर्भात लेखी आश्वासन दिल्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
भूम येथील कार्यालयाकडे लाईट कनेक्शन तात्काळ जोडनेबाबत वारंवार विनंती करण्यात आली होती. परंतु येथील स्थानिकच्या राजकारणामुळे विज कनेक्शन जोडणीस आडथळा निर्माण होत होता. परंतु गुंजाळ कुटूंब वृद्ध असल्याने त्यांनी खासदार ओमराजे निबांळकर यांना फोनव्दारे मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या पदाधिकारी यांना सांगितले. त्या नंतर विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, माजी शहरप्रमुख दिपक मुळे, पत्रकार विहंग कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भगवान बांगर यांनी भेट देऊन संबंधीत विभागाच्या आधिकारी यांच्या बरोबर चार्चा करून मार्ग काढला. आमरण उपोषण मागे घेऊन संबंधीत विभागाच्या आधिकारी यांनी दि 13 मे रोजी पर्यंत विज कनेक्शन जोडणी करून लेखी आश्वासन दिल्याने वृद्ध गुंजाळ कुंटूबाने अमरण उपोषण मागे घेतले. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांनी उपोषण कर्त्याची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला असल्याने समाधान व्यक्त केले आहे.