तुळजापूर(प्रतिनिधी)- पाक पुरकृत  दशहतवाद्यांनी  केवळ  हल्याला हे प्रत्युत्तर असुन भारताने पहिली कारवाई करुन वाघाचा पंजा उगारला आहे. अजुन जबडा उघडला नसुन आता भारताने पीओके ताब्यात घेवुन पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवार दि. 7 मे रोजी श्री तुळजाभवानी दर्शना नंतर पञकाराशी संवाद साधताना केले.

राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी सकाळी श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक पूजा केली. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाला आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळाल्याच्या भावना यावेळी कदम यांनी व्यक्त केल्या. मंदिर संस्थानच्या वतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व कवड्याची माळ भेट देऊन सन्मान करण्यात आला. श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर पञकारांशी बोलताना म्हणाले, श्रीतुळजाभवानी आमची कुलस्वामिनी आहे. गृहराज्यमंञी पदाचा पदभार मिळाल्या नंतर प्रथमच देविचा आशिर्वाद घेण्याचा योग आला आहे. महाराष्ट्राची सेवा माझ्या हातुन करुन घे अशी प्रार्थना केल्याचे यावेळी सांगितले. पाकिस्तान म्हणते आमचे सर्वासामान्य नागरिक हल्यात मारले. असा आरोप पाकीस्तान ने केल्याचा असा प्रश्न पञकारांनी विचारताच पाकीस्तान जगातील सर्वच देशांतील दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश असुन त्यांनी दहशतवाद सर्वसामान्य नागरिक असे बोलुच नये. भारतीय सैन्याला सुट देताच सैन्य दलाचा वाघांनी फक्त पंजा मारला आहे. जबडा अजुन उघडायाचा बाकी आहे. हे पाकीस्तान ने लक्षात घ्यावे. पाकीस्तान दहतवादयांना आश्रय देवुन भारताला ञास देत असल्‌‍ भारताना आता पाकव्याप्त पीओके ताब्यात घेवुन, पाकीस्तानचा ञास कायम स्वरुपी संपवला पाहिजे असे स्पष्ट केले.


पोलिस अधिकारी सहभागी दिसाल्यास त्यास थेट बडतर्फ करणार !

ड्रग्ज प्रकरणात कुठल्याही राजकिय पक्षाचा किती ही मोठा नेता असला तरी त्याचे पुरावे सापडल्यास त्याला सोडणार नाही. या प्रकरणात  पोलिस अधिकारी जरी सापडला तरी त्याला थेट बडतर्फ केले जाईल. असा इशारा देवुन फरारी आरोपीना पकडले जाईल अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी  प्रा सतिश कदम, अमोल जाधव, विकास जाधव, पुजारी शाहुराज मगर उपस्थितीत होते.


 
Top