धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय बौध्द महासभेच्या धाराशिव शाखेच्या वतीने रविवार, 18 मे रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 9.30 ते दुपारी 4 या वेळेत भव्य बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत.या धम्म परिषदेस जिल्ह्यातील उपासक, उपासिकांनी उपस्थित रहावे, आवाहन संयोजक भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दलच्या पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.
बौध्द धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी राजश्री शांताराम कदम या असणार आहेत. तर राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. एस. के. भंडारे, महाराष्ट्र अध्यक्ष यु. जी बोराडे, राज्य सरचिटणीस अशोक केदारे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब वाघमारे, नागसेन माने, हणमंत प्रतापे, अॅड. दिलीप निकाळजे, अॅड. किशोर पायाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या धम्म परिषदेत भिक्खु संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भन्ते महावीरो थेरो, भिक्खु संघाचे सदस्य सारिपुत्त थेरो, तगर भूमीचे संस्थापक अध्यक्ष भन्ते सुमेधजी नागसेन हे प्रमुख धम्मदेसना देणार आहेत.या धम्म परिषदेमध्ये सकाळी 9.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धव्जारोहण, सामुहिक त्रिशरण पंचशील, समता सैनिक दलाची मानवंदना व अभिवादन, त्यानंतर रॅलीस प्रारंभ होणार आहे.
दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे परिषदेचे उद्घाटन होणार आहे. दुपारी 3 वाजता धम्म दिक्षा सोहळा कार्यक्रम तर 4 वाजता धम्म परिषदेचा समारोप होणार आहे.भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर हे बौध्दगया महाबोधी महाविहार आणि प्राचीन बौध्द तीर्थक्षेत्रे इतिहास व सद्यस्थिती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या भव्य धम्म परिषदेस जिल्ह्यातील उपासक, उपासिकांनी उपस्थित रहावे, आवाहन संयोजक भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दलच्या पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.