धाराशिव (प्रतिनिधी)- रूपामाता उद्योग समूह कॉर्पोरेट ऑफिस धाराशिव येथे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी रुपामाता समूह यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रुपामाता मल्टीस्टेटचे कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, रुपामाता अर्बनचे कार्यकारी अधिकारी सत्यवान बोधले, रूपामाता उद्योग समूहाचे जनरल मॅनेजर दामोदर शितोळे, रूपामाता अर्बनचे प्रशासकीय अधिकारी विशाल गुंड इतर अधिकारी, कर्मचार उपस्थित होते.