धाराशिव (प्रतिनिधी)- नापाक पाकविरोधात आज भारतीय वायू सेनेने एयर स्ट्राइक करून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळावर हल्ला करून दहशतवादी स्थळे निस्तनाबूत करून अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकावर जो भ्याड हल्ला केला होता त्याचा बदला घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताने दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानलाही आपल्या सामर्थ्याची स्पष्ट झलक दाखविली आहे. त्यामुळे धाराशिव शहरात भाजपाच्यावतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचे हे ठोस आणि निर्णयक उत्तर आहे. यापुढे जर कोणत्याही भारत विरोधी शक्तीने भारत विरोधी कारवाई केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल हा संदेश या कारवाईतून दिलेला आहे, याचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहून जल्लोष केला फटाके फोडून भारतीय सशत्र दलाच्या समर्थनार्थ घोषणा देऊन उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित नितीन काळे, राजसिंहा राजेनिंबाळकर, अभय इंगळे, युवराज नळे, अमित शिंदे, प्रवीण पाठक, प्रल्हाद धतुरे, लक्ष्मण माने, दर्शन कोळगे, राहुल काकडे, अमोलराजे निंबाळकर, दाजी पवार, अभिजीत काकडे, अक्षय ढोबळे, सुजित साळुंके, रोहित देशमुख, सुनील पंगुडवाले, मेसा जानराव, पुष्पकांत माळाळे, नरेन वाघमारे, आकाश तावडे, किशोर पवार, गणेश इंगळगी, चैतन्य माने, नवनाथ सोलंकर, प्रशांत सावंत, अभिजीत पतंगे, अजिंक्य मुंडे, उमेश चव्हाण, उदय देशमुख, अभिषेक पवार, ओंकार बांगर, विकास पवार, आदित्य किरदत्त,सागर पवार, प्रमोद बचाटे उपस्थिती होते.