तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मसला खुर्द शिवारातील गायकवाड यांच्या शेतातील ऊसासारखे उंच असणाऱ्या थंडगार वातावरणात बसलेल्या बिबट्याने  गजरा गवत काढावायास आलेल्या शेतकरी निखील बाबुराव गायकवाड (27) वर प्राणघातक हल्ला करुन जखमी केले. त्यामुळे शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण  पसरले आहे. सदरील घटना सोमवारी दुपारी दोन वाजता घडली. माञ बुधवार ही बिबट्या वनविभागाला न सापडल्याने मसला खुर्द परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. राञी शेतशिवार निर्मनुष्य झाले आहे.

बिबट्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालु असुन सध्या प्रकृती ठीक असल्याचे समजते.  या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, निखिल गायकवाड हा मसला खुर्द येथील रहिवासी असून, दुपारी शेतातील गजरा गवत काढत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप मारली. या हल्ल्यात निखिलच्या डाव्या बाजूच्या दंडाला मोठी जखम झाली आहे. तसेच, बिबट्याने त्याच्या अंगावर नखांनी वार केले आहेत. निखिल शरीराने दणकट असल्यामुळे तो या हल्ल्यातून बचावला असल्याचे बोलले जात आहे. सदरील हल्ला घटना घडताच वनविभाग तात्काळ अँक्शन मोडवर येवुन येथे पिंजरा लावला असुन पंधरा मीटर कव्हर करणारे दोन कँमेरे या परिसरात बसवले आहेत.  दहा वनरक्षक बिबट्या शोधात फिरत आहेत. सध्या याचा पंचनामा वनविभागाने केला आहे .त्यामुळे जखमी शेतकऱ्याला शासन मदत मिळण्याची शक्यता आहे. वनपरिक्षेञ अधिकारी परचंडे यांच्या मार्गदर्शन खाली वनविभाग बिबट्याचा शोध घेण्यासाठी रानावनात फिरत आहे.



बिबट्या शोधासाठी यंञणा कार्यान्वित- परचंडे 

तुळजापूर तालुक्यात एक बिबट्या फिरत असुन सदरील बिबट्या गजरा गवत उंच असल्याने आत थंडगार वातावरण असल्याने तो तिथे बसला होता. हे गजर गवत काढण्यास शेतकरी गेल्यामुळे त्याचावर हल्ला केला असा असावा. सध्या जमिन वाळल्याने बिबट्याचे ठसे मिळत नाहीत. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी ञास होत आहे. बिबट्या हा हिंसक प्राणी नाही तो दिवसा थंडगार जागी वास्तव्य करतो व राञी फिरतो?  या पार्श्वभूमीवर आम्ही त्याला पकडण्यासाठी  यंञणा कार्यान्वित केली असुन तरी जनतेने राञी अपराञी फिरताना दक्षता घ्यावी. असे आवाहन वनपरिक्षेञ अधिकारी परचंडे, वनरक्षक विनोद पाटील यांनी केले आहे.

 
Top