धाराशिव (प्रतिनिधी)- अल्पसंख्याक समाजातील मुलांच्या शिक्षणाचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. त्यामुळे त्या समाजाचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास खुटलेला आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी अल्पसंख्याक शाळा व मदरसा यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, जिल्हाध्यक्ष असद पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक, प्रदेश उपाध्यक्ष शफी शेख, इफ्तेखार मुजावर, धाराशिव तालुकाध्यक्ष नासिर शेख आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना आमदार नायकवडी म्हणाले की, महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाच्या प्रॉपर्टी म्हणजेच कब्रस्तान व इतर जागांचे संरक्षित करण्यासाठी संबंधित आदेश दिले आहेत. मौलाना आझाद महामंडळाची स्थापना केली त्यावेळी त्यामध्ये कर्ज देण्यासाठी काही अटी टाकण्यात आलेल्या होत्या. मात्र बदलत्या काळात त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असून या विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाज जोपर्यंत शिक्षण घेत नाही. तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. अल्पसंख्यांक शाळा वर काही इतर भाषिक शिक्षकांची पोर्टलद्वारे भरती केली गेली आहे. मात्र, त्या शाळांमध्ये उर्दू भाषेचे विद्यार्थी असून त्यांना उर्दू या मातृभाषेतच शिक्षण मिळणे आवश्यक त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून यापुढे फक्त उर्दू माध्यमाचे शिक्षक भरती केले जाणार असल्याचे आ नायकवडी यांनी सांगितले.


 
Top