तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन  जि. प. प्रशाला काटगाव येथे गुणवंत विद्यार्थ्याचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र दिन ध्वजवंदना नंतर इ पाच वी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र झालेले तेरा  विद्यार्थी त्यामध्ये भाग्यश्री रोकडे, उमेर पटेल, संजना पाटील, समर्थ सुरवसे, प्रतिभा माळी, ईश्वरी वर्दे, आरोही जामगे, अतुल लोखंडे, मनस्वी बेटकर, आयेशा मुर्शद, श्रीकृष्ण म्हेत्रे, अल्फिया खताल, शंकर कांबळे तर आठवी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र झालेले दोन विद्यार्थी त्यामध्ये आकांक्षा चेंडके, माऊली कळवंडे या सर्वाचा प्रशालेतर्फे फेटा बांधून व पुष्पगुच्छ देवून मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांतर्फे सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्याना सपना जाधव, सचिन अंधारे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.  तसेच बीटस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे रोकडे यांच्यातर्फे जाधव व शिंदे या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक राठोड यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगून मार्गदर्शक सर्व शिक्षकांचे कौतुक केले. 

 
Top