तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील जळकोट येथील राजश्री शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी 2025 परीक्षेचा निकाल 98.11% टक्के लागल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
सदर कॉलेजचा निकाल 98.11 टक्के लागला असून विज्ञान शाखेचा 98.80 टक्के तर कला शाखेचा 95.55 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून शाळेतून ओंकार दत्तात्रय शिंदे 86.67 टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर द्वितीय क्रमांक साक्षी शिवाजी कवठे व जान्हवी बाळू आम्ले 82.67 टक्के तर तृतीय क्रमांक अंजली शिवाजी राठोड व उत्कृर्ष बसवराज मडोळे 81.83 टक्के घेतले आहे तर कला शाखेतून शाळेतून 66.83 टक्के घेवुन संदेश अनिल पवार द्वितीय मिना गोपाळ गोबाडे 66.67 टक्के तर तृतीय क्रमांक सोमनाथ अरुण राठोड 66.50 टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहे.
यासह 33 विद्यार्थी हे विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थीयांचे प्रादेशिक उपायुक्त दिलीप राठोड , सहायक संचालक बाबासाहेब अरवत, निरीक्षक युवराज भोसले, माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, संस्थेचे पदाधिकारी माणिकराव चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, प्राचार्य संतोष चव्हाण यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.