धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शाहुराज ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाहुनगर येथे रविवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सजग असलेले पत्रकार तसेच सफाई कामगारांचा सत्कार आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

शाहूराज ग्रुपचे मार्गदर्शक तथा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहर संघटक प्रशांत साळुंके यांच्या पुढाकाराने या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच यावेळी दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनींचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दररोज प्रभागाची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांचा देखील सन्मान करण्यात आला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांचा देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. 

छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी नव्याने बसवण्यात आलेल्या नवीन संभाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठानच्या समोर पहिली मिरवणूक आणि पहिली आरती करण्याचा मान शाहुराज मंडळाला मिळाला. यावेळी असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. त्यांनी  या मंडळाला पहिला पूजेचा मान मिळाल्याबद्दल सत्कार केला. याप्रसंगी आमदार कैलास पाटील, शौकत शेख, अमर भातलवंडे, चेतन वाठवडे, ॲड. श्रीकांत माने, सलीम पठाण, अजित बाकले, युवराज राठोड, दत्ता सोकांडे, रोहित गाबने, अमित देवकर, सुयोग साळुंखे, ओम जगताप, रोहन साखरे, कृष्णा पाटील, प्रेम रणखांब, साईराज कदम, यशराज कदम, स्वरूप सूळ, प्रतीक कदम, राज कदम, अनिकेत कोळगे, महेश चौगुले, समाधान ननवरे, आकाश करवर, शुभम गायकवाड, सोहम खांडवे, साहिल खांडवे, नूर भाई, रोहन खोत आदीसह शंभूप्रेमी युवक, ज्येष्ठ नागरिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top