धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या वतीने एकत्र 'कुटुंब पद्धतीचे महत्त्व' या विषयावर कथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली होती. त्यात इयत्ता नववी ते बारावी या गटात अल्फिया शेख प्रथम तर अनुष्का माळी द्वितीय क्रमांक पटकावला. वय वर्षे 40 पर्यंत च्या गटात स्मिता पाटोळे यांनी प्रथम तर दिपाली घेट्टे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला, आणि वय वर्षे 40 च्या पुढील गटात कल्याणी तांबे यांनी प्रथम क्रमांक तर सुवर्णा शिनगारे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. साहित्य भारती तर्फे या कथा स्पर्धेचे आयोजन डॉ नागेश अंकुश व दिपाली कुलकर्णी यांनी केले होते,तर धाराशिव जिल्हा स्तरावर युवराज नळे यांनी संयोजक म्हणून काम पाहिले होते. सर्व कथा स्पर्धेच्या विजेत्यांना लवकरच प्रमाणपत्र व ग्रंथ देऊन समारंभपूर्वक गौरवण्यात येणार आहे.

 
Top