धाराशिव /परंडा (प्रतिनिधी)- विविध मागण्यासाठी धाराशिव/ परंडा कृषी कार्यालयाच्या कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने दि. 7 मे रोजी धरणे आंदोलन करण्यात करण्यात आले. तालूका कृषी अधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. सदरील मागण्या मान्य न झाल्यास दि. 15 मे रोजी पासुन बेमुदत काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमीत करून कृषी सहाय्यक पदावर नियूक्ती द्यावी, कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी सहाय्यक यांना लॉपटॉप द्यावे, ग्रामस्तरावर काम करण्यासाठी कृषी मदतनिस देण्यात यावा यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहाय्यक कर्मचाऱ्या कडून टप्याटप्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दि.5 मे रोजी काळ्या फिती लाऊन कामकाज करण्यात आले. दि 6 रोजी शासकीय व्हॉटसअप ग्रुप मधून बाहेर पडले. दि 7 मे रोजी कृषी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. दि.8 मे रोजी सामुहिक रजेवर जाणार आहेत. दि.9 मे रोजी पासुन ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. तरीही विविध मागण्या बाबत दखल नाही घेतल्यास दि.15 मे रोजी पासुन कामबंद आदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.


धाराशिवमध्ये ही आंदोलन

या आंदोलनात कृषी सहायक संघटनेचे धाराशिव तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील, कार्याध्यक्ष नितीन जाधव, सचिव सचिन सोनवणे, उपाध्यक्ष किरण आगळे, श्रीहरी कोळी, कोषाध्यक्ष सचिन मगर, जिल्हा प्रतिनिधी आंनद आवारे, पुनम शिंदे, उज्वला खांडेकर आदीसह कर्मचारी सहभागी झाले होते.


परंड्यातही आंदोलन

कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष प्रविण चव्हाण, कार्याध्यक्ष अमित चौधरी, सचिव जीवनकुमार राऊत  कोषाध्यक्ष सुहास गुंड, राहुल जाधव, विकास वेताळ, गिरीष कुलकर्णी, विनोद भाग्यवंत, श्रीमती मनिषा मस्के, विजय कांबळे, लक्ष्मण मिस्कीन, सुधीर देवकर, श्रीमती रेश्मा कामटे, अजित गायकवाड, मिलींद विटकर, राजेंद्र काळे, संतोष माळी आदीसह कर्मचारी सहभागी झाले होते.

 
Top