परंडा (प्रतिनिधी) - परंडा येथील व्यापारी महासंघाचे सचिव हनुमंत विटकर यांची कन्या डॉ. स्नेहा हनुमंत विटकर यांचे वैद्यकीय शिक्षण बीएएमएस विशेष प्राविण्यासह अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल परंडा तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने डॉ. स्नेहा विटकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परंडा व्यापारी महासंघाचे कायम निमंत्रित सल्लागार परंडा तालुका व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष हाजी वाजिद दखनी, परंडा तालुका व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष तनवीर डोंगरे, जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अभय देसाई, व्यापारी महासंघाचे सचिव हनुमंत विटकर, आनंद विटकर मतीन डोंगरे, गोरख देशमाने, जितेंद्र हरियाणी, मन्सूर बहिरे, सरफराज करपुडे, तनवीर हावरे सरफराज करपुडे आधी व्यापारी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर स्नेहा विटकर यांचा सत्कार करण्यात आला.व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या डॉ.स्नेहा विटकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.