धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलची विदयार्थिनी कु . अर्पिता नेताजी मुळे ही महर्षी वात्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ, वैराग संचलित ए. टी. एस. प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात 300 गुणांपैकी 362 गुण घेऊन सातवा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
तिच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुधीर पाटील , सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव तसेच सर्व पदाधिकारी व या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक परमेश्वर कदम यांनी अभिनंदन करून तिला पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.