कळंब (प्रतिनिधी)- कळंबच्या प्रियदर्शनी को-ऑप. बँकेला“पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक“ पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्रीधर भवर यांनी दिली आहे.

दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि. मुंबई यांनी आयोजीत केलेल्या उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) विभागातून 100 कोटीपर्यंत ठेवी असणाऱ्या बँकांमधून सन 2023-2024 सालासाठी “पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक“ पुरस्कारासाठी आपल्या प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँकेची निवड झाली आहे. त्याबद्दल बँकेचे मार्गदर्शक चेअरमन प्रा.श्रीधर भवर आणि बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

 
Top