धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर यांच्या जयंतीनिमित्त जयोस्तु प्रतिष्ठान धाराशिव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवराय व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार कैलास घाडगे पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजसिंह राजे निंबाळकर, माजी नगरसेवक अक्षय ढोबळे, पंकज पाटील, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष देविदास पाठक, भोसले हायस्कूलचे कलाध्यापक शेषनाथ वाघ , शिवशंभु विचार मंचचे डॉ. शिवाजी चव्हाण , ब्राह्मण कल्याण ट्रस्टचे धनंजय जेवळीकर, विपिन गंधोरकर, तसेच संकेत सूर्यवंशी , प्रशांत महाजन त्याचबरोबर जयोस्तु प्रतिष्ठानचे अध्यक्ष सारंग जोशी, सुदर्शन कुलकर्णी, राहुल तुगांवकर, राहुल देशपांडे, अभिजीत रोंधवे, अक्षय कुलकर्णी पदाधिकारी व शहरातील सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच बरोबर उपस्थित मान्यवरांचे जयोस्तु प्रतिष्ठानच्या वतीने सावकार प्रतिमा सन्मानचिन्ह , शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला सुत्रसंचलन सारंग जोशी यांनी केले तर आभार राहुल तुगावकर यांनी मानले.