तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड , नवी दिल्ली. ( सीबीएसई) फेब्रुवारी- मार्च 25 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतील श्री जवाहर नवोदय दहावी व बारावीचा निकाल शंभर टक्के लागला. दहावी मध्ये 82 विद्यार्थी तर तर बारावी विज्ञान शाखेमध्ये 27 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. वर्ग दहावी मध्ये प्रथम सुप्रिया शिंदे 96.4, द्वितीय अजिंक्य सुरवसे 95:4 व तृतीय: राहुल ढोणे 94:2, समीक्षा जाधव 94:2, अंजली सरडे 94:2 मराठी विषयात 100 पैकी 100, 44 विद्यार्थ्यांना तर गणित विषयात 100 पैकी 100 एक विद्यार्थी, आर्ट इंटेलिजन्स100 पैकी 100 एक विद्यार्थी असे प्राविण्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे. वर्ग बारावी मध्ये प्रथम : आदेश कातुरे 90.2 द्वितीय: ऋतुजा अडतराव 88:00 ,तृतीय: रोहित यादव 86.06 या विद्यार्थ्यांचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व विद्यालयाचे चेअरमन कीर्ती कुमार पूजार, विद्यालयाचे प्राचार्य के.वाय. इंगळे. या विद्यार्थ्यांना हरी जाधव, वैभव कुलकर्णी, चक्रपाणि गोमारे, सुजाता कराड, यश पाटील, सचिन खोब्रागडे , प्रमोद खरबास, संजय माने, विलास राऊत, स्मिता पवार, छाया घोटणकर, रविंद्र अलसेठ या तज्ञ शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.