परंडा (प्रतिनिधी)- प्रेरणास्थान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री स्व. प्रमोद महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते संपर्क कार्यालय परंडा येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीर चौधरी, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी,युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, परसराम कोळी, रामदास गुडे, धनंजय काळे, आदर्श ठाकूर, सुरज काळे, किरण कवटे, उत्तम शिंदे, महिला मोर्चा शहराध्यक्षा ज्योतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.