तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथील साईट वरील तांबा व ॲल्युमिनीयम धातुची केबल किंमत 17 लाख 55 हजार रुपये किंमतीचे अज्ञात चोरट्यांनी मंगळवार दि.20 मे रोजी राञी चोरुन नेल्याची घटना घडली.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, किर्तीकुमार देवदास भोजक, रा. ओंकार अपार्टमेंट जगदाळे कॉलनी प्रतिभा नगर कोल्हापूर ह.मु. शालीमार कॉलनी, ललीत मंजील शिंगोली ता. जि. धाराशिव  यांचे सावरगाव येथील साईटवरील वेगवेगळ्या स्क्वेअर एम.उम तांब्याचे धातुचे व ॲल्युमिनीयम धातुचे 15248 मिटर केबल एकुण 17 लाख 55 हजार रूपये किंमतीची दि.20.05.2025 रोजी 18.00 ते दि.21.05.2025 रोजी 11.00 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशी मजकुराची फिर्याद किर्तीकुमार भोजक यांनी दि. 24. 050 2025 रोजी दिल्यावरुन तामलवाडी पोलिस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) गुन्हा नोंदवला आहे.

 
Top