तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी मंदीर महाद्वारसमोरील अतिक्रमणामुळे भाविकांची गैरसोय या मथळ्या खाली दैनिकात वृत्त प्रसिद्‌‍  होताच नगरपरीषद प्रशासनाने याची दखल घेवुन रविवारी मंदीर महाद्वार समोरील किरकोळ विक्रेत्यांना तिथे थांबु न दिल्याने भाविकांना मंदीरात जा-ये करताना होणारी कसरत दूर झाली.

किरकोळ विक्रेत्यांना भवानी रोडवर बसुन व्यवसाय करण्यास भरपूर जागा प्रशासनाने उपलब्ध करुन दिली असताना काही किरकोळ विक्रेते येथेच ठाण मांडुन व्यवसाय करतात. याचा फटका भाविकांना बसत आहे. किरकोळ विक्रेते हटवले. माञ उतार रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण हटवताना दुजाभाव होत असल्याचा आरोप किरकोळ विक्रत्यांकडुन केला गेला.

 
Top