धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर शहारातील एमआयडीसी सभागृहात बंकटस्वामी बीड संस्था द्वारा संचलित महाराष्ट्र सर्वात जुने चित्रकला महाविद्यालयीन सन 95 ,96,97 च्या सालात शिक्षण घेतलेले 35 वर्षाने एकत्रित मित्रांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.
सकाळी नोंदणी झाल्यावर राष्ट्रगीत व राज्यगीतांनी मेळाव्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली व पहेलगाम भ्याड हल्लातील शहीद भारतीय नागरिक व जवान , चित्रकला महाविद्यालयचे स्व.कुलकर्णी , निकम वर्गमित्र स्व. सावरीकर कलावंत ज्ञात अज्ञातांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर प्रास्ताविक नेताजी यादव यांनी केले त्यानंतर प्रदीपकुमार शिंगवी सोलापूर ' स्नेहालय ' यांच्या सौजन्याने शबनम पिशवी, फरटोपी, पंचा, स्मृतीचिन्ह देऊन जेष्ठ शिक्षक शिवाजी वाघ प्राचार्य अविनाश सातपुते, प्रा. संजय खोचरे, प्रा.विनय बागडे संस्था प्रतिनिधी वैशाली भोसले - सातपुते यांचा माजी विद्यार्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित वर्गमित्रांचा परिचय शबनम, टोपी, स्मृतीचिन्ह सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवर व माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. सदर माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी विशेष परिश्रम दत्ता शिंदे, सुदर्शन पाटील यांनी घेतल्याने सौ. मिरा वाघ- चव्हाण कुटुंबाच्या वतीने शाल पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन शेषनाथ वाघ यांनी केले. तर आभार सविता आळणे यांनी मानले त्यानंतर बहारहार आवाजात अनिस शेख, कामशेट्टी, किरण वाघमारे, शेषनाथ वाघ, नेताजी यादव यांच्या गायनावर सर्व वर्गमित्रांनी नृत्यविष्कार सादर केला. 30 वर्षानंतर थेट भेटीने वर्गमित्रांमध्ये आनंद दिसून येत होता. भोजन, चहापानानंतर पसायदानाने मेळाव्याची सांगता करण्यात आली.