तुळजापूर - तुळजापूर धाराशिव महामार्ग  रस्त्यावर बोरी गावालगत असलेल्या शिवशक्ती धाब्यास आग लागुन यात धाब्याचे मोठे नुकसान झाले सदरील आग शाँर्टसर्कीट नेलागल्याचे समजते सदरील घटना सोमवार दि12रोजी सांयकाळी 5.15वा घडली. लगेच नगरपरीषद अग्नीशमन दलाचा वाहनांनी येथे येवुन आग  विझवली या आगीत जीवीत हानी झाली नसले तरी मोठे अर्थिक नुकसान झाले.

या बाबतीत अधिक माहीती अशी बोरी शिवारात राजाभाऊ भोसले यांची जमिन असुन त्याचा जागेत शिवशक्ती धाबा होता. तो गुजराती माणसाला चालवयाला दिला होता. सोमवारी सांयकाळी शाँर्टसर्कीट  होवुन धाब्यास आग  लागली. येथे दोन गँस सिलेंडर होते ते पेटल्याने आग वाढली. आगीचे लोळ तुळजापूरात दिसु लागले. आग लागताच नगरपरीषद अग्नीशमन दलाचे दोन वाहने येवुन ती आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. यात अर्धा धाबा जळुन खाक झाला असून नुकसान नेमका अंदाज कळु शकला नाही.


 
Top