तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मसला खुर्द शिवारात शेती कामे करणाऱ्या युवकावर हल्ला करणारा बिबट्या वनविभागाने सापळा लावुन ही त्यात येईनासा झाल्याने बिबट्या कुठे गायब झाला असावा अशी चिंता मसला खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना लागली आहे.
सोमवारी दि. 5 मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घटना घडल्यानंतर वनविभागाने विविध पथके बिबट्या शोधात कार्यान्वित केली. परिसराता पिंजरा लावला. त्यात बिबट्या यावा म्हणून बोकड ठेवला. पंधरा मीटर कव्हर करणारे दोन कँमेरे या परिसरात बसवले आहेत व दहा वनरक्षक बिबट्या शोधात फिरत आहेत. तरीही बुधवार पर्यत बिबट्या दिसुन न आल्याने बिबट्या कुठे गायब झाला कि या परीसरातुन इतरञ गेला याचा ठावठिकाणा लागत नसल्याने वनविभाग हैराण झाले आहे.