तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आलियाबाद येथे राहुरी येथील डॉ माने मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर आणि एसबीआय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.8 मे 2025 रोजी चालता फिरता दवाखान्याचे शुभारंभ करण्यात आले.
सदरील दवाखाना गाडी ही तालुक्यातील आलियाबाद, रामतीर्थ, येडोळा, लोहगाव, नंदगाव, बोरगाव, हगंरगा नळ, इंदिरा नगर तांडा,बोरमन तांडा, जळकोटवाडी तांडा,होर्टी,मैलापूर, यांच्यासह 22 गावात फिरणार आहे. सदरील चालता, फिरता दवाखान्यासाठी एसबीआय फाऊंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर राजाराम चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे.या दवाखान्याचा आज आलियाबाद येथे शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, देविदास चव्हाण, शिवाजी पोलीस पाटील प्रोजेक्ट इन्चार्ज संजय पवार, डॉ. रणधीर बनसोडे, फार्मास्टीक समाधान गाडेकर,लॅब टेक्निकल शुभम राठोड ,बाबु राठोड, व्यंकट राठोड, मोतीराम राठोड, बाबुराव चव्हाण, धनाजी राठोड, अरुण चव्हाण, सुनील चव्हाण,हरीदास चव्हाण यांच्या गावातील महिला, पुरुष , रुग्ण उपस्थित होते. शेवटी ग्रामपंचायतच्या वतीने डॉ माने मेडिकल फाउंडेशनचे व एसबीआय फाउंडेशनचे आभार व्यक्त करण्यात आले.