तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रात शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने तसेच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार  दि. 9 मे रोजी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होते.

मंदीर भाविकांनी खचुन भरुन गेले होते. आज सुमारे दीड ते दोन लाख भाविकांनी देवीदर्शन घेतले. यात तीन महिन्याचा बालका पासुन ते ऐंशी वर्षाचा वृद्ध भाविकांचा समावेश होता. गुरुवार राञी पासुनच भाविक मोठ्या संखेने तिर्थक्षेञ तुळजापूरात आगमन होवु लागले. शुक्रवार  दि. 9 मे रोजी पहाटे 1 वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनास आरंभ झाला. राञी एक वाजल्या पासुन  भाविकांनी  देविदर्शनार्थ गर्दी केल्याने पहाटे पासुन भाविकांनी मंदीर गजबजुन गेले होते. सकाळी सहा नंतर भाविकांचा ओघ मंदीरात प्रचंड वाढला तो सांयकाळ पर्यत जैसे थे होता. आज धर्म, अभिषेक, मुख, सशुल्क दर्शन रांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या. आज  शहरातील तापमान  41 अंशावर गेल्याने शहरात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता.घामाचा धारेत भाविकांनी दर्शन घेतले.  


 
Top