धाराशिव (प्रतिनिधी)- सद्य परिस्थितीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मागणी पाहता यावर्षीपासून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंगच्या या शाखेकडे कल वाढलेला दिसत आहे. इंजीनियरिंग शाखेमध्ये विविध ब्रँच मध्ये मुलांचा उत्साह दिसत आहे. सध्याचे आधुनिक युग पाहता विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पनांना वाव देणाऱ्या शाखा हव्या असतात. महाविद्यालये नॅशनल आणि मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी परिपूर्ण विद्यार्थी पाठवत असतात. कोरोना काळानंतर ज्या कंपन्या फक्त विशेष इंजिनिअरची मागणी करत होते. त्या आता मेकॅनिकल इंजिनियर आवश्यक आहे असे सांगतात.
नुकतीच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथे यश ग्रुप ऑफ कंपनीचे एच आर नितीन बेद्रे यांनी मेकॅनिकल विभागाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे एक एक्सपर्ट टॉक ही घेतला. त्यामध्ये त्यांनी यश इंडस्ट्रीच्या आळणी फाटा, चाकण व पुणे येथे असणाऱ्या युनिटची माहिती दिली. त्यादरम्यान त्यांनी औद्योगिक क्षेत्रात असणारी मेकॅनिकलची गरज विशद केली. याचाच एक भाग म्हणून त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये सरळ सेवा भरती मध्ये मेकॅनिकल इंजिनियरची आवश्यकता असल्याचे सांगितले. मेकॅनिकलचा विद्यार्थी हा एखादा सॉफ्टवेअर करून सॉफ्टवेअर इंजिनियरच्या तोडीस तोड होतो; म्हणून विविध कंपन्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगितले.
याच एक्सपर्ट टॉक दरम्यान बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने म्हणाले की, मेकॅनिकल इंजिनियर्सची ऑटोमोबाईल, एरोस्पेस, मॅन्युफॅक्चरिंग, सस्टेनेबल एनर्जी, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स सारख्या क्षेत्रांत मोठी मागणी आहे.“मेक इन इंडिया“ सारख्या सरकारी उपक्रमांमुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला चालना मिळाली आहे, ज्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी वाढल्या आहेत. कार्यक्रमादरम्यान बोलताना अकॅडमी डीन व मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते यांनी कॉलेज राबवत असलेल्या मेकॅनिकल विभागातील विविध कोर्सेसची माहिती दिली. या कार्यक्रमाचे आयोजन विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सदस्य प्रा.आर. ए. दंडनाईक यांनी केले व त्यांना सहकार्य प्रा. एस. पी. बिरादार यांनी केले.