भूम (प्रतिनिधी)- बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय सोलापूर यांच्या वतीने क्षेत्रीय प्रबंधक संजीव कुमार, उपक्षेत्रीय प्रबंधक सुजित कुमार झा, मुख्य प्रबंधक एम. डी.जावेद सलिम, नोडल ऑफिसर वैभव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ईट अंतर्गत मौजे डोकेवाडी (ता. भूम) येथे पीक कर्ज नूतनीकरण विशेष मोहीम भव्य मेळावा कार्यक्रम गुरुवारी (ता. 22) रोजी संपन्न झाला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी बोलताना मुख्य कार्यालय पुणे येथील बँक अधिकारी महेश शेळके म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेत परत करावे व डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना याचा लाभ घ्या. शेतकऱ्यांनी शासनाकडून व्याज परतावा मिळतो. त्याचबरोबर त्यांचे सिबिल चांगले राहते. बँकेचे कर्ज घेणे व ते वेळेत परत फेडणे यामुळे आपली बँकेत पत निर्माण होते. आपण घेतलेले पीक कर्ज वेळेत परतफेड केले तर त्या शेतकऱ्यांना मध्यम मुदत कर्ज उपलब्ध आहे. महाराष्ट्र बँकेकडे आता सोने तारण कर्ज ही उपलब्ध आहे. फक्त 30 मिनिटात कर्ज मिळते त्याचा व्याजदर अतिअल्प आहे. त्याचबरोबर खातेदारांनी प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना याचा ही खातेदारांनी लाभ घ्या. असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात सलग तीन वर्ष नूतनीकरण केलेल्या शेतकरी विठ्ठल कोळेकर, गणेश आहेर, मधुकर मांडवे, राजेंद्र जालन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झोनल नोडल ऑफिसर वैभव घाडगे,शाखा व्यवस्थापक दीपक गवळी, कृषी अधिकारी आबासाहेब भागवत, सरपंच सुषमा थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुरेश खैरे, विकास जालन,विशाल डोके, लिंबराज जालन, अनिल भराटे, सी.आर. पी अश्विनी निंबाळकर, बँक मित्र प्रवीण भोईटे, योगेश चव्हाण, बालाजी साबळे, प्रकाश मोटे, सोमनाथ गायकवाड, आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन महावीर जालन यांनी केले. तर आभार दीपक गवळी यांनी मानले.