धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार “ उस्मानाबाद “ या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “धाराशिव“ असे करण्यास केंद्र सरकारकडून पुढील प्रक्रिया सुरू झाली होती. गृह मंत्रालयाच्या दिनांक 2 डिसेंबर 2024 च्या पत्रानुसार, या नाव बदलाच्या प्रस्तावावर भारतीय सर्वेक्षण विभागाची टिप्पणी मागवण्यात आली होती. यानंतर देखील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव असे नामांतर करण्याबाबत संथ गतीने प्रक्रिया सुरू होती. या अनुषंगाने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी सह बैठक घेऊन सदर स्थानकाचे नाव धाराशिव असे नामांतरित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करणे बाबत सूचित केले होते. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून पत्राव्दारे पाठपुरावा केला होता. त्यानुसार केंद्र शासनाने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नामांतर धाराशिव असे करण्यास मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे धाराशिव या प्राचीन ऐतिहासिक शहराला पारंपरिक ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.        

 
Top