धाराशिव (प्रतिनिधी)- खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मौजे नंदगाव ता. तुळजापुर येथील निप्रश्री शांतलिंगेश्वर विरक्त मठ, नांदगाव येथे 10 लक्ष रुपये खर्चून सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले. खासदार निधीतून लोकार्पण उत्साहात पार पडले. यावेळी महाराज राजशेखर महास्वामीजी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
सभामंडपाच्या उभारणीसाठी खासदार निधीचा उपयोग केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या सभामंडपाचा उपयोग ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांसाठी तसेच सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांसाठी होणार आहे. कार्यक्रमानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामविकास, युवकांचा सहभाग आणि सामाजिक एकजुटीवर चर्चा केली. या कार्यक्रमास कमलाकर चव्हाण, अशोक भाऊ पाटील, गजेंद्र पाटील, प्रकाश चव्हाण, कृष्णाथ मोरे, सूर्यकांत अरबळे, परमेश्वर चिनगुंडे, गिरीश नवगिरे, राजेंद्र जाधव, सोमनाथ परशेट्टी, बाळू मारेकर, राजू मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार निधीतून उभारलेला सभामंडप नंदगाव गावासाठी नवा अध्याय ठरला असून, याचा लाभ ग्रामस्थानला होणार आहे.