तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. सोलापूरहून लातूरकडे जात असताना त्यांनी तुळजापुरात थांबून देवींचे दर्शन घेतले.
दुपारच्या सुमारास तुळजापूर परिसरात जोरदार पावसाची संततधार सुरू होती. या पावसातही अंबादास दानवे यांनी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्या सोबत उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी हे देखील उपस्थित होते. मंदिर परिसरातील आगमनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांनी स्वागत केले. तसेच मंदिर संस्थानच्या वतीने श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व कवड्याची माळ भेट देऊन दानवे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) रामेश्वर वाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे, सहायक सुरक्षा निरीक्षक दीपक शेळके तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.