तुळजापूर (प्रतिनिधी)-  राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज श्रीतुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेऊन भवानीमातेची पूजा केली. वस्त्रोद्योग मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनास आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेने सर्वकाही दिलेले असून मातेचा आशीर्वाद नेहमी सोबत रहावा अशी भावना व्यक्त केली. 

यावेळी मंदिर संस्थान कडून तहसीलदार तुळजापूर तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवाणी मंदिर संस्थान अरविंद बोळंगे यांनी महावस्त्रे व देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी आरती वाकुरे, मंदिर संस्थान चे सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, लेखापाल तेजस कराळे, जनसंपर्क अधिकारी गणेश निरवळ, प्रशांत जाधव व मंदिर संस्थान चे इतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top