धाराशिव (प्रतिनिधी)-  दिनांक 8 व 9 मे 2025  रोजी क्रेस्ट इन्फोमेडिया 9 वी ऑल इंडिया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग  सर्वोच्च परिषद 2025 हॉटेल सहारा मुंबई येथे आयोजित केली होती. सदर शिखर परिषदेत देश भरातील बऱ्याच सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील परिषदेमध्ये जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव यांना सन 2025 सालचा नेट  इंटरेस्ट इन्कम विभागातील पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, संचालक आशिष मोदींनी, तानाजी चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके आदी उपस्थित होते.

जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव 1933 पासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असून 92 वर्षांची परंपरा आहे. बँकेच्या महाराष्ट्र व कर्नाटक एकूण 30 शाखा कार्यरत आहेत. बँकेने 31 मार्च अखेर 3145 कोटी, ठेवी 1874.68 कोटी, कर्ज 1270.11 कोटी व गुंतवणूक 1096.63 कोटी, नेट एन.पी.ए.0 टक्के व नफा 45.07 कोटी झालेला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने एक पथदर्शी धोरण समोर ठेवून वाटचाल केल्यामुळे बँकेच्या प्रगतीत लक्षणीय वाढ झालेली आहे. सदरील शिखर परिषदेत आयोजित चर्चासत्रात बँकेच्या वतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी सहभाग नोंदवून आपले विचार मांडले. सदरील शिखर परिषदेस देशभरातील जवळपास 300 बँकेच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. 


 
Top