भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे डॉ. अनुराधा जगदाळे यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात असून शिक्षणक्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि प्रशासनातील कार्यकौशल्य या नव्या जबाबदारीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
डॉ. अनुराधा जगदाळे या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका असून त्यांनी अनेक संशोधनपर लेख, शैक्षणिक प्रकल्प आणि विद्यार्थी कल्याणाच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच नॅक च्या आक्युएसी समन्वयक म्हणून त्यांनी महाविद्यालयाचे काम पाहिले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले आहेत. या निवडीबद्दल विद्या विकास मंडळ पाथरुडचे अध्यक्ष डॉ. उद्धव बोराडे, उपाध्यक्ष डी. डी. बोराडे, सचिव मुरलीधर काटे, सहसचिव तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.संतोष शिंदे व सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले असून भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय अधिक प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.