भूम (प्रतिनिधी)- भूम येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व अवैध वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षक भूम यांना दिलेल्या पत्रात केले आहे.

रा.प.भूम आगाराच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रा.प.भूम बसस्थानक परिसरात अवैध दारू विक्री व संशयित अवैध वाहतूक क्रियाकलाप नियमितपणे सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, आगाराचे कर्मचारी आणि वाहतूक नियंत्रक यांनाही त्यांचे नियमित कर्तव्य पार पाडताना अडथळे येत आहेत. या संदर्भात वेळोवेळी विविध दैनिक वर्तमानपत्रांमध्येही या प्रकाराबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, ज्यामुळे सदर प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित होते.

सदर अवैध कृतीमुळे बस स्थानक परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.प्रवाशांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे.आगाराच्या कर्मचाऱ्यांना व वाहतूक नियंत्रकांना त्यांचे नियमित कार्य करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

अशा अवैध कृतीमुळे संस्थेच्या प्रतिमेला बाधा पोहचत असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बदनाम होत आहे.या बाबीचा गांभीर्याने विचार करून तपास पथकाद्वारे कारवाई करून अशा अवैध प्रवृत्तीला तात्काळ आळा घालावा. तसेच आवश्यकतेनुसार बस स्थानक परिसरात गस्त वाढवावी, जेणेकरून या प्रकारांना प्रतिबंध करता येईल व भविष्यात यासारखे प्रकार घडू नयेत यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक व्यवस्था करावी अशी मागणी (ता 22) रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर आगार व्यवस्थापक भूम यांचे स्वाक्षरी आहे.

 
Top