भूम (प्रतिनिधी)- भूम शहर पाणी कृती समिती च्या भूम शहरासाठी भूम शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा अमृत 2 योजना मंजूर असून या योजनेमुळे भविष्याचा विचार करता भूम शहराची वाढीव लोकसंख्या व वाढीव भागातील जनतेची पाण्याची समस्या सुटणार आहे. हे काम आरसोली-वंजारवाडी प्रकल्पातून पाईप लाईन करण्यासाठी वंजारवाडी, ता.भूम येथील ग्रामस्थ चुकीच्या पध्दतीने विरोध करत असून त्यासाठी पोलीस बंदोबस्तात हे काम पूर्ण करावे. अशी मागणी भूम शहर पाणी कृती समिती ने केली आहे.
केंद्र सरकार मार्फत अमृत 2 ही योजना नगर पालीका राबवत आहे. या योजनेअंतर्गत आरसोली वजारवाडी लघु प्रकल्पातून नवीन पाईपलाईन करण्यासाठी या ठिकाणी पाईप टाकले आहेत. परंतु वंजारवाडी येथील काही ग्रामस्थ यांनी या प्रकल्पातून पाईपलाईन करुन भूम नगर पालीकेने पाणी घेऊ नये, यासाठी विरोध करत पाईपलाईनचे काम आडविले आहे. पाईपलाईन करीता आणलेले पाईप जबरदस्तीने गावामध्ये नेहून टाकले आहेत. वास्तविक पाहता नगर पालीकेने भविष्यातील पाणी टंचाईचा विचार करुन साल सन 1998 मध्ये शासनाकडे पीण्याचे पाण्यासाठी मागणी केली होती. त्या अनुशंगाने शासनाने भूम शहरातील पाण्यासाठी एक दसलक्ष पाणी वापरात आहे. पालीका आरक्षीत केलेले पाणी घेणार आहे. त्यामुळे 2.29 दसलक्ष घनमीटर पाणी आरक्षीत केलेले आहे. आरक्षीत पाण्यापैकी नगर परिषद सध्या वंजारवाडी ग्रामस्थांनी केलेला विरोध चुकीचा आहे. शहराची वाढती लोकसंख्या व शहरातील काही उंच भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नगर पालीकेने ही अमृत 2 योजना केंद्र सरकारकडून मंजूर करुन घेतली आहे. त्यासाठी वंजारवाडी ग्रामस्थांनी या योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या पाईप लाईनला विरोध करु नये, विरोध टाळावा अशी मागणी सर्व भूमकरांची आहे. त्यासाठी या निवेदनाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेवून शासनाने अमृत-2 योजनेसाठी निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात योजनेचे काम करण्यास मदत करावी व आरसोली-वंजारवाडी प्रकल्पावर भूम शहरामध्ये पाणी आणण्यासाठी अमृत 2 योजनेकरीताचे पाईप जे वंजारवाडी ग्रामस्थांनी घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल संबंधीत ग्रामस्थांवर कठोर कार्यवाही करावी. भविष्यात विनाकारण होणारा संघर्ष टाळावा, अशी मागणी सर्व भूमकरांची वतीने करण्यात येत आहे. तसेच भूम शहराकरीता बाणगंगा तलावामधुन असणारी जूनी पाणी पुरवठा योजना पूनः जीवन करण्याची परवानगी द्यावी. अशा मागण्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात माडल्या आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,भूम शहर पाणी कृती समितीचे अध्यक्ष दिलीप गाढवे,रोहन जाधव, भागवत शिंदे,अरुण देशमुख,संजय होळकर, ॲड.पंडीत ढगे,डॉ.राजाराम कोकाटे,अमोल भोसले,प्रभाकर हाके,पोपट जाधव,तौफीक कुरेशी, योगेश आसलकर,नारायण वरवडे, रंणजीत साळुंखे, संजय साबळे यांच्यासह भूम शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.