धाराशिव (प्रतिनिधी)- कोंड येथिल महात्मा फुले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनचा स्नेह मेळावा सोमवार दि. 12 मे रोजी विद्यालय परीसरात सकाळी 09:00  ते 05:00 वाजे पर्यंत पार पडला.

स्नेह मेळाव्यात सन 2008 - 2009 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी तब्बल 16 वर्षानी एकत्र जमले. एकमेकांच्या खुशाली घेत सर्वांनी शालेय आठवणी ना उजाळा दिला. दिवंगत वर्ग मित्रांना श्रद्धांजली आर्पन करण्यात आली. स्नेह भोजन, तसेच विद्यार्थ्यांनचे सद्या काय कामकाज करतात याबाबत जाणून घेतले त्यांचे मनोगत ऐकले .सर्वांनु मते मे 2028 साली ही स्नेह मेळावा घेण्याचे ठरले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक पडवळ व्ही.आर. तर प्रमुख पाहुणे काळे, बारबोले,सुरवसे, बुरले, घोगरे, चौधरी, मोकासे, धंगेकर, कांबळे, सोलापूरे मँडम सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमास मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.स्नेह मेळावा 2008 - 2009 च्या 10 वी वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी 10 वी वर्गातील विद्यार्थी पुजा हाऊळ, मंजुश्री निकते, प्रतीभा पाटील,ज्योती भोसले, अनुसया लोंढे, आश्विनी चव्हाण, जयश्री भोसले, शितल मोरे, मनीषा नन्नवरे, जमादार, भाग्यश्री शेटे ,महेश पाटील, गोपाळ लोंढे, अमर भोसले, महावीर शेळके, सुरेश गुरव ,साधू भोसले, इरफान बागवान, आशिष जाधव, अल्ताफ मुलाणी, अतुल बिडवे, विठ्ठल घोडके, रोहित लोंढे, सुदाम मजगे,उमेश गायकवाड, सुरज शेख,अमर आरळकर ,तौफिक सिंध ,प्रशांत जाधव, प्रदीप जाधव, गोपाळ हाऊळ, सतीश घोडके, गोविंद लोंढे, जयराम भोसले, सागर परदेशी, विनोद शेटे, इकबाल मुलाणी, स्वप्नील पाटील, प्रमोद परदेशी, बंडू शिंदे,दत्ता पवार, लखन पाटील, मुन्ना जमादार, गजानन भुमकर,सग्राम आरळकर,दत्ता भोसले, राजकुमार लोंढे, योगेश पाटील, हसन सिंध,गोपाळ भोसले उपस्थित होते. सुत्र संचालन स्वप्नील पाटील यांनी केले. आभार बंडू शिंदे, ज्योती भोसले, पुजा हाऊळ यांनी मानले.


 
Top