धाराशिव (प्रतिनिधी)-  तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांना “प्रिन्सिपल ऑफ द इयर अवॉर्ड फॉर इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स“हा पुरस्कार देऊन पुणे येथे गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अभिनंदन केले. 

डॉ. विक्रमसिंह व्ही. माने हे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्यांचे 35 हून अधिक शोधनिबंध प्रतिष्ठित जर्नल्स, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांची तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव  येथे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी म्हणून सात वर्षाहून अधिक काळ काम पहिले असून, त्यांनी कंपन्यांच्या 100 हून अधिक भरती कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस, जस्ट इंजिनिअरिंग, प्रिसिझ एम्प्लॉयबिलिटी स्किल्स,  राधे इंजीनियरिंग यांसारख्या विविध कंपन्यांसाठी 2500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे (सॉफ्ट आणि टेक्निकल स्किल्स) आयोजन केले आहे. त्यांच्या कार्यकाळात 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना अद्ययावत/नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे यासाठी राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक कार्यशाळा आयोजित केले होत्या.

त्यांनी केलेल्या संशोधनामुळे कास्टिंग  निर्मिती करणाऱ्या उद्योगांना कास्टिंग मधील डिफेक्टचे प्रमाण 70% पेक्षा कमी झाले आहे.त्यामुळे त्यांना साठाव्या इंडियन फाउंड्री काँग्रेस बंगलोर येथे सर्व उत्कृष्ट प्रबंध या पुरस्काराने प्रमाणित केले होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील, विश्वस्त बाळासाहेब वाघ, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,उद्योजक, कर्मचारी व आजी माझी विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

 
Top