धाराशिव (प्रतिनिधी)-दि.1 मे 2025 महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या पक्षाच्या वतीने 2023-2024 च्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बागल, कु.शिल्पा डोंगरे व कु.गौरी शिंदे या त्रिमुर्ती सहीत त्यांच्या संपूर्ण कुटूंबाचा जाहीर सत्कार जिल्हा कार्यालय धाराशिव येथे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील खो-खो मार्गदर्शक म्हणून श्री.प्रविण तानाजीराव बागल त्यांच्या मातोश्री अनुसया तानाजी बागल, पत्नी स्मीता प्रविण बागल, मुलगी भार्गवी बागल, बंधू ॲड कैलास बागल त्याचप्रमोण धाराशिव जिल्ह्यातील आट्या-पाट्या खेळातील राष्ट्रीय खेळाडू कु.शिल्पा डोंगरे, वडील सर्जेराव डोंगरे, आई पंचफुला डोंगरे, शरद गव्हारसर, भाऊ गोविंद डोंगरे, अशोक असबे त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील खो-खो या खेळातील कु.गौरी शिंदे, त्यांचे वडील राजेश शिंदे, आई नंदीनी शिंदे या त्रिमुर्तीच्या संपूर्ण परिवाराचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी दुधगांवकर यांनी राज्यपातळीवर शिवछत्रपती पुरस्कार मिळाविलेले बागल,डोंगरे व शिंदे यांचा जिल्ह्याला अभिमान आहे असे सांगून जिल्ह्यातील तरुण मुला-मुलींनी यांचा आदर्श घ्यावा असे सांगितले.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र बिराजदार, जिल्हा चिटणीस मुस्ताक हुसेनी, ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी डोंगे, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.ताडेकर, डॉ.मोहन बाबरे, ॲङप्रविण शिंदे, इकबाल पटेल, गणपत चव्हाण, नंदकुमार जाधव, अनिल जाधव, शामसुंदर पाटील, पंडीत घाटगे, अर्जुन मोरे, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत पाटील, भारत वनकळस, गणेश गडकर, उत्तरेश्वर धाबेकर, श्रीकांत धाबेकर, नाना कसबे, अक्षय धाबेकर, राहुल धाबेकर, गणेश धाबेकर, शुभम वडगणे, यांच्यासह आदी जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.