तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विविध ठिकाणी तीस वर्षाचा प्रदीर्घ सेवेनंतर बुधवार दि. 30 एप्रिल रोजी श्रीमती सुनेत्रा रवींद्र अलसेट (क्रीडा अध्यापिका ) यांचा सेवापूर्ती कार्यक्रम घेवुन त्यांना निरोप देण्यात आला.
प्राचार्य के वाय इंगळे आणि परिवाराच्या वतीने त्यांचा शाल, साडी, बुके,चांदीची वस्तू भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला . सी एस गोमारे ,एस एस माने, बी एम गवले, एस आर कराड मॅडम, एम .पी. कुलकर्णी, तेजस अलसेट, तनुश्री अलसेट, इसाक पटेल यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार प्रसंगी श्रीमती सुनेत्रा रवींद्र अलसेट म्हणाले की मी ज. न. वि .बुलढाणा, (महाराष्ट्र) येथे 1993 सप्टेंबर पासून कार्यास प्रारंभ केला.ज. न. वि. ढेमाजी (आसाम), ज.न. वि. बागलकोट (कर्नाटक), 30 एप्रिल 2025 रोजी जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथून सेवानिवृत्त होत आहे. अशी 35 वर्षे सेवा केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या हातून गेलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. याचा सार्थ अभिमान मला आहे. त्यामुळे मी आता आनंदी आहे. माझी पूर्ण कुटुंब सुखी समाधानी आहे. माझ्या कार्याचे मला समाधान वाटत आहे. अशा प्रकारच्या भावना त्याने व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रभारी हरी जाधव यांनी केले.