तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. सोलापूर वरून धाराशिव मार्गे जळगावला जात असताना ते तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाला आले होते. मंदिर संस्थानच्या वतीने पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व कवड्याची माळ भेट देऊन सन्मान करण्यात आला.