भूम (प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीने व लोक कल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने  भूम तालुक्यात आरोग्य व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन विविध गावांमध्ये करण्यात आले आहे .त्यामध्ये आरोग्य चिकित्सा ( तापसर्दी ,डोकेदुखी, अंगदुखी, ऍसिडिटी,नेत्र परिक्षण, चष्मा व औषधे वाटप) प्रत्येक दिवशी प्रत्येक ठिकाणी फक्त एक दिवसासाठी सदर शिबिरामध्ये चष्मा घ्यावयाचा असल्यास नाममात्र दोनशे रुपये चष्मा बनवून देण्यात येईल. तालुक्यातील 14 गावामध्ये हे शिबिर घेण्यात येणार आहे. याची सुरुवात 9 मे रोजी उळूप मारुती मंदिरासमोर, 10 मे ईट सिद्धेश्वर मंदिर, 11 मे माणकेश्वर लोकमान्य टिळक विद्यालय, 12 मे वालवड ग्रामपंचायत कार्यालय, 13 मे वांगी (बु) ग्रामपंचायत कार्यालय, 14 मे आरसोली मारुती मंदिर, 15 मे भूम कल्याण स्वामी मठ, 16 मे अंतरगाव मारुती मंदिर, 17 मे हिवरा राम मंदिर समोरील सभागृह, 18 मे गणेगाव मारुती मंदिर, 19 मे पखरुड महादेव मंदिर, 20 मे चांदवड सभागृह चांदवड, 21 मे बावी, बावी फाटा, 22 मे तित्रज हनुमान मंदिर तालुक्यातील या ठिकाणी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत शिबिर असणार आहे तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख रंजीत पाटील व तालुकाप्रमुख अनिल शेंडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन शिवसेना, युवासेना, महिला आघाडी समस्त पदाधिकारी, शाखाप्रमुख व शिवसेना भूम शहर व तालुका यांच्यावतीने केले आहे.

 
Top