धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शिक्षक कॉलनी भन्साळी व्हिला येथे संस्कार भारती देवगिरी प्रांत पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्हा संस्कार भारती जिल्हा पदाधिकारी यांची बैठक संपन्न प्रथम ध्येय गीतानी सुरुवात झाली त्यानंतर प्रांत पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले . प्रांत कोष प्रमुख मोहन राव तोळे यांनी धुळे येथे संपन्न होणाऱ्या सर्वसाधारण सभेबाबत सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर प्रांत सहकोषमुख ॲड.संजय घायाळ यांनी सभासद नोंदणी तसेच आर्थिक वर्ष 2025चा लेखा जोखा विस्तारित मांडला व दैनंदिनी 2025- 26 प्रमुख शेषनाथ वाघ यांनी हिशोब सादर केला . या प्रसंगी देवगिरी प्रांत मातृशक्ती प्रमुख गीता रावतोळे, प्रांत सह महामंत्री डॉ. सतिश महामुनी , प्रांत दृष्य कला संयोजक शेषनाथ वाघ ,प्रांत फोटोग्राफी सह संयोजक पद्माकर मोकाशे, जिल्हा संरक्षक प्रभाकर चोराखळीकर , जिल्हाकार्याध्यक्ष अनिल ढगे,माजी अध्यक्ष पं. दिपक लिंगे, जिल्हाप्रमुख श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा सचिव दिपक महामुनी, जिल्हा सहकोषप्रमुख अविनाश धट, जिल्हा संगीत संयोजक सुरेश वाघमारे, जिल्हा मंचीय संयोजक प्रविण गोरे, धाराशिव शहर समिती संयोजक शरद वडगाकर, धनंजय जेवळीकर, महादेव केसकर, अक्षय भन्साळी,सौ. ज्योती भन्साळी, सौ.अंकिता बलदवा,कु.आग्या बलदवा उपस्थित होते. प्रसायदानाने बैठकीची सांगता होऊन सुत्रसंचलन शेषनाथ वाघ यांनी केले तर आभार अक्षय भन्साळी यांनी मानले.