तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार समोर  किरकोळ विक्रत्यांनी ठाण मांडुन व्यवसाय सुरु केल्याने देविभक्तांना मंदीरात जाये करताना कसरत करावी लागत आहे.  सध्या दररोज लाखोचा संखेने भाविक देविदर्शनार्थ येत असताना अतिक्रमणे वाढल्याने यात भाविकांची गैरसोय होवुन हाल होत आहेत.

श्रीतुळजाभवानी  मंदीर महाध्दार समोरील किरकोळ विक्रत्यांना  यापुर्वी नगरपरीषद, पोलिस, मंदीर प्रशाषणाने संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबवुन महाव्दार समोरील अतिक्रमण हटवले होते. माञ काही दिवसानंतर रस्ता मधोमध किरकोळ व्यापारी वर्गाने ठाण मांडुन व्यवसाय सुरु केल्याने या परिसरातुन जा-ये करण्यासाठी भाविकांना कसरत करावी लागत आहे. सध्या वीस फुटाचा रस्ता पाच  फुट मार्गक्रमण करण्यासाठी राहिला आहे. यातुन दरारोज लाखो भाविकांना जा-ये करावी लागत आहे. किरकोळ  व्यापारी रस्त्यावर ठाण मांडुन बसल्याने दुकानदार मंडळीनी अतिक्रमण करुन व्यवसाय करीत आहे.  सध्या मोठ्या संखेने किरकोळ स्ञी, पुरुष व्यापारी भवानी रोडवर व्यवसाय करतात. माञ बोटावर मोजण्या इतके किरकोळ व्यापारी महाव्दार समोर ठाण मांडुन व्यवसाय करित आहेत. नगरपरीषद अतिक्रमण विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अतिक्रमणात दिवसेंदिवस  वाढ होत असल्याने नुतन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी ही अतिक्रमणे काढुन भाविकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

 
Top