धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे नवीन 33/11 के.व्ही.ए क्षमतेचे वीज उपकेंद्राच्या भूमिपूजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पार पडला.

एम.एस.के.व्ही.वाय 0.2 या योजनेतून 2 ते 2.50 कोटी रुपये खर्च करुन 2 एकर जागेवरती सदर उपकेंद्र येणाऱ्या 18 महिण्यामध्ये पुर्ण होणार असून परीसरातील नागरीकांची प्रलंबीत मागणी या उपकेंद्रामुळे पुर्ण होणार आहे. या विद्युत उपकेंद्राच्या निर्मीतीमुळे नंदगावसह सिंदगाव, बोरगाव, बोळेगाव, हंगरगा (नळ), लोहगाव आदी गावासह आजूबाजूच्या परिसरातील शेती, लघुउद्योग व घरगुती वीज वापर अधिक सक्षम, सुरळीत व दर्जेदार होणार आहे. ग्रामीण भागात आधुनिक पायाभूत सुविधांचा विस्तार करणे हा आमचा संकल्प आहे, आणि हे उपकेंद्र या दिशेने एक मोठे आणि महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. असे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर उद्घाटनावेळी जाहीर केले.

नवीन सबस्टेशन भविष्यातील वाढती वीज मागणी पूर्ण करण्यास समर्थ ठरणार आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेच्या समस्यांवर कायमचा तोडगा मिळणार असून, या भागातील ग्रामीण भागाचा वीज विकास अधिक भक्कम होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत होणार असून कृषी करीता होणाऱ्या विद्युत पुरवठयात नियमीतता येणार आहे. यावेळी महावितरणचे अधिकारी तसेच कमलाकर चव्हाण, अशोक भाऊ पाटील, गजेंद्र पाटील, प्रकाश चव्हाण, कृष्णाथ मोरे, सूर्यकांत अरबळे, परमेश्वर चिनगुंडे, गिरीश नवगिरे, राजेंद्र जाधव, सोमनाथ परशेट्टी, बाळू मारेकर, राजू मोर या सर्वांनी या महत्त्वपूर्ण उपस्थिती होती.  

 
Top