भूम(प्रतिनिधी)- मौजे देवळाली ता. भूम येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व सदगुरू शामनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याचे किर्तनाची सांगता ह.प.भ धर्मराज दादा सामनगावकर यांच्या किर्तनाने झाली.
या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख तथा दिशा समितीचे सदस्य रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी ह.प.भ रामदास महाराज सामनगावर व ग्रामस्थांच्या वतीने दादांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी देवस्थानासाठी धाराशिव जिल्हाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या स्थानिक खासदार निधीतून 7 लक्ष रूपये सभागृहासाठी देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख अनिल दादा शेंडगे, अजित तांबे, राहुल पाटील , चेतन कदम ,गुलाबराव गायकवाड ,सुनील तांबे ,विजयकुमार शेटे, भाऊराव गायकवाड, चेतन कदम, किशोर जगताप ,प्रशांत विधाते, निरंजन पाटील, धनराज तांबे, सुभाष बोराडे, लक्ष्मण लुंगारे ,आकाश महाराज जगताप ,रामदास खंदारे ,बळीराम जगताप, प्रतिक खंदारे,प्रफुल्ल आरगडे,दनंजय जठार,बालाजी माळी,बालाजी खंदारे,प्रमोद टिळक , बुध्दीवान लटके , बावची सरंपच नाना महाराज रोडगे व सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थीत होते.