कळंब (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात मुकबधिर प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवत,तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगांव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब जि.धाराशिव येथील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला आहे.विशेष प्राविण्य ०२, प्रथम श्रेणीत ०६, द्वितीय श्रेणीमध्ये ०१असून निकाल पुढील प्रमाणे आहे.लखन व्यंकट अवधूते -  ७५.६०% प्रथम, कु.स्नेहा समाधान कोळी - ७५.२०% द्वितीय, गणेश सुधाकर वनवे - ७१.६०% तृतीय, विष्णू श्रीहरी वायबसे - ६९. ८०% , जयराम व्यंकट अवधूते- ६०.८० %, सुरज प्रताप वाघमारे -६९.६०%, कु.तेजस्विनी प्रदीप चवरे- ६८.०० %, सुमित शिवाजी इंगळे- ६४. ६० %, कृष्णा महादेव शिंदे - ५७. ६०%, या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तुळजाई प्रतिष्ठानचे सचिव सन्माननीय श्री.शहाजी चव्हाण साहेब व शाळेचे मुख्याध्यापक श्री. बालाजी जाधवर सर, विशेष शिक्षक आश्रुबा कोठावळे, श्रीमती गुंड सुनीता, श्रीमती सुनंदा गायकवाड, गणेश फरताडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 
Top