परंडा (प्रतिनिधी)-पोकलेनच्या व्यवहारात फसवणूक केल्याची तक्रार परंडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस कडून दिलेल्या माहितीप्रमाणे तालुक्यातील दयानंद पवार रा.इनगोदा यांनी परंडा पोलीस स्टेशनला पोकलेन व्यवहारात फसवणूक केल्याची तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की दि.25 मार्च रोजी परंडा येथे राहुल इतापे रा एरंडोल यांच्याशी पोकलेनचा व्यवहार ठरला होता.फिर्यादी यांच्या नावावर असलेल्या सॅनी कंपनीचा पोकलेन आरोपी यांना देण्याचा करार स्टॅम्प पेपरवर केला.
या करारानुसार मशीन विकत घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याला 75 हजार रुपयांची रक्कम द्यायची होती. आरोपी यांनी ही रक्कम भरली नाही.तसेच पोकलेन मशीन परत करण्यास नकार दिला अशी तक्रार दाखल झाल्यावरून परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास परंडा पोलीस हे करीत आहे.