धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या देवगिरी प्रांताध्यक्षपदी धुळे येथील प्राचार्य संजीव गिरासे यांची निवड करण्यात आली. प्रदेशमंत्री नितीन केळकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत नूतन कार्यकारिणीची घोषणा केली.
देवगिरी प्रांतात मराठवाड्यातील आठ आणि खानदेशातील तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. प्राचार्य गिरासे हे खानदेशातील कथा, कांदबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. त्यांची आतापर्यंत कथा, कांदबरी, ललित लेखाची बारा पुस्तके प्रकाशित आहेत. साडेतीन हजारांच्यावर कथाकथनाचे कार्यक्रम झाले असून सध्या ते म्हसदी (ता.साक्री) येथील अण्णासाहेब आर. डी. देवरे कला, विज्ञान महाविद्यालयाच प्राचार्य म्हणून काम पाहतात.
नव्या कार्यकारिणीत प्रांत कार्याध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगरचे उमेश काळे यांची निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष : प्रा. डॉ.विजय लोहार (जळगाव), डॉ.रविंद्र तांबोळी (नांदेड), डॉ.सुनिता सांगोले (लातूर), मंत्री : युवराज नळे (धाराशिव), कार्यालय व प्रमुख : प्रा. डॉ नागेश अंकुश (छत्रपती संभाजीनगर), प्रचार व समाज माध्यम प्रमुख : विलास फुटाणे (छत्रपती संभाजीनगर), सदस्य : दिनेश नाईक, (अमळनेर), ज्ञानोबा मुंडे (परभणी), दीपाली कुळकर्णी (छत्रपती संभाजीनगर), डॉ.उषा शर्मा (जळगाव), आरती सदाव्रते (जालना), निमंत्रित सदस्य : दत्ता जोशी (छत्रपती संभाजीनगर), शरद छापेकर (जळगाव), संदीप चौधरी (नंदूरबार).